Share

कलाकारांच्या वागण्यावर अन्नु कपुर यांनी दर्शवली तिव्र नाराजी; ट्विट करत केले ‘हे’ अवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. या काळात चित्रपटसृष्टी आणि क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमिवर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. लॉकडाउनमुळे मुंबई तसेच राज्यातील चित्रीकरण थांबलेले आहे. यामुळे बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सुटीचा आनंद घेण्यासाठी देशाबाहेर गेले आहे. यावर बॉलीवुडचे जेष्ठ अभिनेते अन्नू कपुर यांनी तिव्र नाराजी दर्शवली आहे.

अन्नु कपुर यांनी शुक्रवारी एक ट्विट केले त्यात ते म्हणाले की, ‘सगळ्या क्षेत्रातील श्रीमंत आणि मान्यवरांना विनंती करतो की देशा-परदेशात तुम्ही जिथे सुट्ट्यांसाठी गेला आहात तर तुमच्या आनंदाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू नका. कारण यावेळी देशातील बहुतांश नागरिक कोरोनाच्या विषाणुशी लढा देत आहे. अशावेळी फोटो पोस्ट करून त्यांच्या दुःखावर मीठ चोळुन त्यांचे शिव्याशाप तुम्ही का घेत आहात?’ असे लिहीले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात परिस्थीती गंभीर होत आहे. अनेकांचा जिव उपचाराअभावी, अपुऱ्या औषधाअभावी जिव गमवावा लागत आहे. तर एकीकडे अनेक कलाकार देशाबाहेर जाउन सुटीची आनंद घेत आहे. तसेच ते फोटोही सोशलमीडीयावर पोस्ट करत आहे. देशातील सद्यस्थितीवर भाष्य करणारी एक कविता अन्नू कपूर यांनी गुरुवारी ट्विटवर पोस्ट केली होती. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी देशातील करोना परिस्थितीवर नेमके भाष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!