Share

माधुरी देत आहे मास्क लावण्याचे धडे : पहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतान देखील अनेक महाभाग कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. या वाढत्या महामारीला थांबवण्याकरिता राज्य शासनाने कडक नियम लागू केली असली तरी नागरिक मात्र या निर्बंधांना जुमानताना दिसत नाही आहेत. नागरिक शासनाच्या कोणत्याच नियमच पालन करताना दिसत नाहीत. वारंवार शासनाकडून मास्क वापरण्याचे सांगण्यात येत असले तरी देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

परिस्थिती बिकट बनत चालली असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांनी नियमांचं पालन करावं यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

https://www.instagram.com/p/CN72copn0y2/?utm_source=ig_web_copy_link

यावरच आता सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मास्क घालण्याची योग्य पद्धत सांगत आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला ती मास्क घालण्याच्या चुकीच्या पद्धती कोणत्या ते सांगते. हनुवटीवर, कपाळावर, फक्त तोंडावर या सर्व मास्क घालण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत असे माधुरीने सांगितले आहे. नाक तोंड पूर्ण कव्हर करून मास्क घालणे ही पद्धत योग्य आहे असे माधुरीने या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना सांगितले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!