Share

२५ लाख कर्जाचे आमिष दाखवून ५० हजाराचा गंडा, आरोपीवर गुन्हा दाखल

Published On: 

नांदेड: शहरात एकीकडे कोरोनामुळे संचारबंदी असताना नागरिकांवर सायबर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे, शहरातील साईनगर भागातील फळ व्यावसायिक तरुणाला २५ लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून इन्शुरन्स काढण्यासाठी ५० हजार रुपये बँक खात्यात टाकण्यास सांगितले. परंतु कर्ज मंजूर न करता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याची घटना १७ फेब्रुवारी २०२१ पासून आजपर्यंत घडली.

साईनगर भागातील फळ विक्रेता तरुण अब्दूल मुबान अब्दुल मजीद यास फेब्रुवारी महिन्यात बजाज फायनान्सच्या नावाने २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचा फोन आला. त्याकरीता तुम्हाला इन्शुरन्स काढण्यासाठी ५० हजार रुपये लागतील, असे सांगितले. फिर्यादीने पंजाब नॅशनल बँक खात्यात व कॅनरा बँकेचे खात्यात वेगवेगळ्या तारखेला तीन वेळा पन्नास हजार रुपये कर्ज मिळण्यासाठी भरले.

कर्ज मंजूर न करता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणूक केली. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात ८०/२१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कृष्णा काळे अधिक तपास करीत आहेत. अशा घटनांमुळे नागरिकाना आर्थिक फटका बसत आहे, संचारबंदीमुळे आधीच काम गेले आहे, त्यात अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!