Share

फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई

Published On: 

नवी दिल्ली : बलात्काराच्या आरोपानंतर भारतातून फरार झालेल्या नित्यानंदला आता मात्र कोरोनाची भीती वाटायला लागलीय. कारण त्यानं त्याच्या देशात कोणीही येऊ नये असं फर्मान काढलंय. भारतातून फरार झाल्यानंतर नित्यानंदने इक्वाडोरजवळ एक बेट विकत घेत त्यावर स्वतःचा देश निर्माण केल्याचा दावा केला आहे. त्याला त्यानं कैलाश असं नाव दिलं असून ते जगातलं एकमेव हिंदूराष्ट्र असल्याचा त्याचा दावा आहे. स्वतःला जणू देवच समजणाऱ्या या नित्यानंदला आता कोरोनाची भीती वाटत आहे.

जगभरात कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळं भारतासह काही देशांच्या नागरिकांना त्याच्या देशात नित्यानंदनं प्रवेशबंदी केली आहे. त्यात भारतासह, मलेशिया, ब्राझिल आणि युरोपीयन युनियनचा समावेश आहे. या देशातील नागरिकांनी त्याच्या बेटावर किंवा या देशात येऊ नये असं नित्यानंदनं म्हटलंय. याबाबत त्याने ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्याने हा राष्ट्रपतींचा आदेश असल्याचं म्हटलं आहे.

जगभरात सर्व देशांमध्ये असलेल्या कैलाशच्या दुतावासांकडं त्यानं हा आदेश पाठवल्याचेही यामध्ये म्हटलं आहे. या बेटावर राहणाऱ्या सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि क्वारंटाईन राहावं असंही या आदेशात म्हटलं आहे. स्वयंघोषित साधू असलेल्या नित्यानंदचा काही वर्षांपूर्वी एका साध्वी बरोबरचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला. पण तो फरार झाला.

भारतातून फरार झाल्यानंतर त्याने इक्वेडोर याठिकाणी एक बेट विकत घेतलं आहे. त्या या बेटाला कैलाश असे नावही दिले असून हा स्वतंत्र देश असल्याची घोषणा केली आहे. हा देश म्हणजे जगातलं एकमेव हिंदुराष्ट्र असल्याचा दावा तो करतो. त्यानं देशाची घटना, पासपोर्ट, मंत्रिमंडळ तयार केल्याचाही दावा केला जातोय. शिवाय कोणत्याही हिंदुला इथं नागरिकत्व मिळू शकतं असा दावा त्यानं केलाय.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!