🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरुने राजस्थान रॉयल संघाचा १० गडी राखुन पराभव केला. या विजयासह आरसीबीची विजयी घौडदौड कायम आहे. आरसीबी संघाचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे.
राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शानदार शतक झळकावले. या शतकानंतर पडिक्कल वर सर्वस्तरातुन कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. मात्र कॉंग्रेस खासदार शशी थरुर यांनी केलेल्या एका ट्विटमुळे एक नवाच वाद उद्भवला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारे देवदत्त पडिक्कल आणि संजु सॅमसन दोन्ही खेळाडू हे मल्याळी असल्याचा धागा धरत शशी थरुर यांनी ट्विट केले की,’किती आश्चर्याची गोष्ट आहे. की आयपीएलमधील यंदाची दोन्ही शतके ही मल्याळी फलंदाजानी केली आहे.’ असे म्हणत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.
How amazing that both the centuries in this year’s #IPL have been scored by Malayalis, when Kerala has so long been regarded as a cricketing backwater! Congratulations @devdpd07 for joining @IamSanjuSamson as the only two to cross the hundred mark so far this year
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
या ट्विटनंतर कर्नाटक प्रांताचे माजी भारतीय खेळाडू डोड्डा गणेश यांनी शशी थरुर यांच्या ट्विटला उत्तर देत म्हणले आहे की, ‘२९१६ साली जेव्हा करुण नायरने त्रिशतक झळकावले होते. त्यावेळीही श्रेय घेणारे पुढे आले होते. मात्र आता त्याचा सर्वांना विसर पडला.’ असे म्हणत त्यानी पुढे लिहीले आहे की, ’तसेही करुण नायर आणि पडिक्कल दोन्ही खेळाडुंना घडवण्यात केरळचा काहीच हातभार नाही. ते कर्नाटकचे खेळाडू आहेत’ पडिक्कल आणि नायर हे स्थानीक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक संघाकडून खेळतात.
Well, a lot of people owned Karun Nair after he scored a triple century in 2016 and disowned him after he lost his place. Now the same with Devdutt. Agree, they’re Malyalis. But, Kerala had no role in Karun & Devdutt’s progress as cricketers. They’re Karnataka boys. Period. https://t.co/LbFatnK0lg
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (@doddaganesha) April 22, 2021
महत्वाच्या बातम्या
- निलेश लंकेंनी शब्द पाळला; बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी दिला !
- 1 मे आधी तुला लस मिळालीच कशी? ; अनिल कपूर यांनी लस घेतल्यानंतर पोरासह नेटकऱ्यांनीही घेतली फिरकी
- रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू नयेत – रामदास आठवले
- मजहब नही सिखाता आपस मै बैर रखना! हिंदू मित्राच्या मुलासाठी मुस्लीम बांधवांनी दिला खांदा
- अक्षर पटेल कोरोनावर मात करुन दिल्लीच्या ताफ्यात सामील; ‘बापु आला’ म्हणत व्हिडीओ शेअर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
