मुंबई : कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकतंच बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने कोरोना लसीचा दुसरा डोज घेतला. लस घेतानाचा एक फोटो त्याने शेअर केला आणि हा फोटो शेअर करताच चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. अनिल कपूरचे वय 64 वर्ष आहे. मात्र अनिल कपूरला पाहून त्यांचे वय इतके आहे. यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
https://www.instagram.com/p/CN4YOnKhD7n/?utm_source=ig_web_copy_link
कोरोना लसीचा दुसरा डोज घेतानांचा त्याचा फोटो पाहून चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट दिल्यात. अनिलने लस टोचतानाचा फोटो शेअर करताच अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याने कमेंट केली. तुम्ही दुसरा डोज कसा घेतला? मुळात 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तिला लस मिळालीच कशी? अशी मजेदार कमेंट त्याने केली. यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा यांनीही अनिलची अशीच फिरकी घेतली. ‘तू तर 18 वर्षांपेक्षाही कमी वयाचा आहेस,’ असे त्यांनी लिहिले. अश्या बऱ्याच कमेंट सध्या सोशल मीडियावर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
- ‘शरद पवारांना आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा उत्तम अनुभव त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो’
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला


