Share

अक्षर पटेल कोरोनावर मात करुन दिल्लीच्या ताफ्यात सामील; ‘बापु आला’ म्हणत व्हिडीओ शेअर

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा सुरु होऊन १० दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. दिल्ली कॅपीटल्स संघाचा नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर जखमी असल्याने या सत्रात रिषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. स्पर्धेत झालेल्या आतापर्यंतच्या चार सामन्यात पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

दिल्ली कॅपीटल्सचा पुढचा सामना हा सनरायझर्स हैदराबाद संघासोबत येत्या रविवारी होणार आहे. या सामन्यापुर्वी दिल्लीचा स्टार खेळाडू अक्षर पटेलने कोरोनावर मात करत दिल्लीच्या ताफ्यात पुनरागमन केले आहे. बापु आला म्हणून दिल्लीने ट्विट करुन एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडीओत अक्षर आपल्या संघातील खेळाडुंशी भेटत असल्याचे दिसते. तसेच सगळे त्यांचे स्वागत घेत करत आहे.

अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत तब्बल २७ गडी बाद केले होते. मात्र आयपीएल स्पर्धेपुर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करुन तो आता परत आला आहे. अक्षर पटेलच्या पुनरागमनामुळे दिल्लीच्या गोलंदाजीची धार अधिक तेज झाली आहे. तसेच मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही तो संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!