नगर : जानेवारी महिन्यात राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या आहेत. यंदा, कोरोनाचा असलेल्या धोका, निवडणूक आयोगाचा खर्च, वेळ व गावातील ग्रामस्थांमध्ये होणारी वादावादी टाळण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला होता. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होईल त्यांच्या विकासकामांसाठी निधी देण्याचा शब्द या नेत्यांनी दिला होता.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील आपल्या तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा शब्द दिला होता. वेळी विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह तालुक्यातील विरोधकांनीही शंका उपस्थित करीत इतका मोठा निधी कोठून देणार, अशी टीका केली होती. आता हा शब्द निलेश लंके यांनी पाळला आहे.
हंगे, शिरापूर, रांधे, कारेगांव, वेसदरे, पिंप्रीपठार, जाधववाडी, भोयरेगांगर्डा व पळसपूर यासह नगर तालुक्यातील आकोळनेर ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली होती. बिनविरोध निवडणुका झालेल्या गावांना 25 लाखांचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. ‘मी दिलेला शब्द पाळणारा आहे, केवळ वाचाळविर नाही,’ असं भाष्य करत निलेश लंके यांनी विरोधकांना टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
- ‘शरद पवारांना आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा उत्तम अनुभव त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो’
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

