औरंगाबाद : भारत देशाची रचना हि विविधतेतून एकता अशी आहे. भारतात अनेक धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. सध्या कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक जन आपापल पाहण्यात मग्न असताना शहरात एक हिंदू मुस्लीम एकतेची घटना घडली आहे.
सिटी चौक हा हिंदू मुस्लीम संमिश्र वसाहतींचा परिसर आहे. इथे पिढ्यानपिढ्या पासून ते एकत्र नांदतात. त्याच भागात राहणाऱ्या दलाल हार्डी यांच्या जन्मतः दिव्यांग असलेल्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या अंतयात्रेसाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नसताना, त्याच भागात राहणाऱ्या त्यांच्या मुस्लीम मित्रांनी हार्डी यांच्यासाठी पुढाकार घेतला.
दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोध हार्डी हा जन्मतः दिव्यांग होता. त्याच्यावर विविध ठिकाणी उपचार देखील करण्यात आले. मात्र, शेवटी त्याचा मृत्यू झाला. सध्या कोरोना मुळे अनेक जन अंतयात्रेसाठी कान कूच करत असताना. त्याच भागातील मुस्लीम बांधवांनी सुबोधला खांदा दिला, शिवाय त्याचे विधीवत अंत्यसंस्कारहि केले. त्यामुळे पुन्हा एकदां शहरात हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन झाले.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

