Share

सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून

Published On: 

जळगाव : नव्या निर्देशानुसार जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणारेत. एकवेळ दुधविक्री बंद राहणार असल्याने जिल्हा सहकारी दूध संघापुढे दीड लाख लिटर अतिरिक्त दुधाच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झालाय. एकवेळ विक्री बंद झाल्यास शेतकऱ्यांकडील दूध खरेदी थांबवण्याची वेळ येईल. त्यामुळे सायंकाळी चार तास दुधविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा दूध संघाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

जिल्हा सहकारी दुध संघाकडे दररोज ३ लाख लिटर दुधाचे संकलन होते. जिल्हाभरातून दूध संकलन होऊन त्यावर दूध संघात प्रक्रिया केली जाते आणि शहरातून त्याचे वितरण केले जाते. सकाळ आणि संध्याकाळी दूध विक्री होत असल्याने दुधवितरणाचे काम २४ तास सुरू असते. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये दूध विक्रीसाठी केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत वेळ ठरवण्यात आलीये. त्यामुळे सायंकाळी विक्रीअभावी पडून असलेले अतिरिक्त दूध विक्री करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सकाळच्या वेळेत दीड लाख लिटर दुधाची विक्री होत असून उर्वरीत दीड लाख लिटर दूध सायंकाळी विक्री होते. एकच वेळ विक्री होणार असल्याने सायंकाळचे सर्व दूध अतिरिक्त ठरणार आहे. त्यामुळे सायंकाळी चार तास दुध विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा दुध संघाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे..

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!