🕒 1 min read
नागपूर : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची साद घातली असून केंद्राने देखील मदतीचा हात दिला आहे. मात्र, महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. अशातच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी मोदी सरकार आणि श्री. नितीन गडकरीजी यांचे मनःपूर्वक आभार ! @narendramodi @nitin_gadkari #BJP4SEVA pic.twitter.com/Q3teoxLRJc
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 22, 2021
नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन पुरवठा होणार असून याचा विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी भिलाईमधून ६० टन द्रव्य प्राणवायू असलेले टँकर मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दररोज १५७ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार आहे. प्राणवायूची मागणी बघता शहरातील ५० खाटापेक्षा जास्त असलेल्या रुग्णालयांनी हवेतून प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
- पराभवासह केकेआरने केली चेन्नईच्या संघाची ‘या’ नकोशा विक्रमात बरोबरी
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
