🕒 1 min read
जालना: जिल्ह्यात १७ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. यासोबतच दिवसभरात ७९६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. नियम पाळण्याचे आवाहन, कडक निर्बंधांसह अत्यावश्यक सेवा-सुविधा वगळता इतरांना प्रतिबंध अशी एकापाठोपाठ एक कडक पावले शासन-प्रशासनाकडून उचलली जात असली लोकांची वर्दळ सुरूच आहे. यामुळे कोरोनाचा संसर्गही थांबेना. जिल्ह्यात आतापर्यंत ६४७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३९ हजार ६५० जणांना बाधा झाली आहे. ३१ हजार ९०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी दररोज बाधितांसह मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७९६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये अँटिजेन चाचणी बाधित आलेल्या रुग्णांची संख्या १८८ आहे. कोरोनामुक्त ८७१ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या ७१०० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज १७ जणांचा कोवीड संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता ६४७ झाली आहे.
जिल्ह्यात आज आढळून आलेल्या बाधितांमध्ये जालना शहरासह तालुक्यातील २८९, मंठा तालुक्यातील २१, परतूर तालुका ४१, घनसावंगी तालुक्यातील १५८ , अंबड तालुक्यातील ७६, बदनापूर तालुक्यातील ४९, जाफ्राबाद ३२, भोकरदन तालुक्यातील ९३, तर इतर जिल्ह्यातील ३७ रुग्णांचा समावेश आहे. ढालेगाव १, राहेरा १, बोडखा २, बोरगाव ४, जिरदगाव १, खाडका १, भागगाव २, खलापुरी ४, रामसगाव १, मुरमा २, कंधारी २, शेवगल १, लासलगाव १, शिवणगाव २, कोठाळा १, नागोबाची वाडी १, उकडगाव १, भेडाळा १ आदीसह ७९६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. अर्चना भोसले यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मित्राच्या मदतीने भावानेच केला विधवा बहिणीचा खून!
- केकेआर विरुद्ध सीएसके कसा जिंकला? ; धोनीने सांगितले कारण, म्हणाला…
- यष्टिमागे ‘माही’चा महापराक्रम ; १५० बळी मिळवणारा पहिला शिलेदार
- हॉटेलची उधारी का मागितली म्हणत, तरुणाची दगडाने ठेचून हत्या!
- चेन्नई सुपर किंग्सच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पॅट कमीन्सने नोंदवला ‘हा’ विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
