🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. देशात देखील कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
पुणे शहरात आज नव्याने ५ हजार ५२९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ८२ हजार ४९१ इतकी झाली आहे. परंतु आज शहरातील ६ हजार ५३० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख २४ हजार २९७ झाली आहे. हा एक पुण्यासाठी आशेचा किरण मानला जात आहे. पुणेकरांची कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे हे चित्र आहे.
दरम्यान, पुणे शहरात आज एकाच दिवसात २० हजार ४०९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १९ लाख ४६ हजार २३७ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५१ हजार ९२० रुग्णांपैकी १,३१४ रुग्ण गंभीर तर ६,२३५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार २७४ इतकीझाली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे राज्याला ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आयात करण्यासाठी स्पेशल रेल्वे तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्याचा कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चर्चा तर होणारच…! चेन्नई सुपर किंग्जच्या मराठमोळ्या पठ्ठ्याची धडाकेबाज अर्धशतकी खेळी !
- घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीमध्ये ऑक्सिजन टँक बसवला
- संचारबंदीत नाथ घाट परिसरात फटफटी गँगचा धुमाकूळ!
- कोरोनामुळे झालेले मृत्यू म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने केलेली हत्या- खासदार जलील
- सुनेच्या खून प्रकरणी सासू-सासऱ्याला तीन महिन्यानंतर अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
