🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्वाचा खेळाडू रविंद्र जडेजाचा ‘वीर’चे निधन झाले आहे. ‘वीर’ हे जडेजाच्या घोड्याचे नाव आहे. नुकतेच वीरचे निधन झाले आहे. रविंद्र जडेजा इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर पोस्ट करुन वीरला शेवटचा निरोप दिला आहे.
आपल्या पोस्टमध्ये जडेजाने लिहीले की, ‘आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण मी तुझी आठवन म्हणून नेहमीच लक्षात ठेवीन. तुझ्यासोबत जो वेळ घालवला तो मी कधीच विसरनार नाही. वीर तु नेहमीच माझ्यासाठी खास राहशील. तुला शांती लाभो.’ या शब्दासंह रविंद्र जडेजाने वीर सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जडेजा आयपीएल स्पर्धेत व्यस्त असल्यामुळे त्याला शेवटचा निरोप द्यायला स्वत: जाउ शकला नाही.
https://www.instagram.com/p/CN4lan5p1KQ/
त्याच्या या पोस्टनंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी वीरला श्रंद्धाजली अर्पण केली आहे. सध्या सुरु असलेल्या नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. या सामन्यात जडेजाने दोन बळी घेत, क्षेत्ररणक्षात कमाल दाखवताना ४ झेल घेतले होते. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक देखील झाले होते. सीएसकेने हा सामना ४५ धावांनी जिंकत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला होता.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आज पासून ‘या’ जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यु’
- नाशिकमध्ये धक्कादायक मृत्यूचे सत्र सुरूच, एकाच दिवशी चक्कर येऊन 11 जण दगावले
- लातूरच्या आरोग्यसेवेसाठी कॅलिफोर्नियातून मदत !
- ‘राज्यातले सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॉग्रेससुद्धा बोलू लागली आहे’
- भोरमधील तीनशे वर्षांची परंपरा खंडीत, श्रीराम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
