औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढतच आहे. सक्रिय रुग्णसंख्याही वाढत होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर खुप ताण आला आहे. ६ दिवसात ८,८१६ बाधितांची जिल्ह्याभरामध्ये भर पडलेली दिसुन येत आहे. त्यातील शहरात ४, २६३ तर ग्रामीण भागात ४,५५३ रुग्ण आढळले. दररोजच्या रुग्णवाढीतही शहरालगतच्या गावांमधील बाधित रुग्णसंख्येचा टक्का वाढल्याने ग्रामीण भागामध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे.
मागच्या वर्षी ग्रामीण भागात शहराजवळचे तसेच बाजारपेठांची गावे वगळता फारसे संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीणचा आकडा नेहमीच कमी होता. मात्र, मागच्या आठवड्यापेक्षा सातत्याने शहरापेक्षा ग्रामीणमध्ये बाधित अधिक संख्येत आढळून येत आहेत. त्यातही गंभीर झालेले रुग्ण ग्रामीण भागातून शहरात रेफर होत असताना बेडची शोधाशोध करताना नातेवाईकांची दमछाक होत आहे.
बाधितांचा शोध, तपासणी आणि लसीकरण करुन घेण्यासाठी ग्रामदक्षता समित्या नेमण्यात आल्या आहेत. मात्र, लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाची टक्केवारी घसरल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत. तिथे आवश्यक बेड आहेत. मात्र, गंभीर रुग्णांना शहरामध्ये यावे लागत आहे. त्यांना खाटा उपलब्ध करुन देण्यात अडचणी होत असल्याचेही ते म्हणाले. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आलेली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- मजुरांनी जिथे आहे तिथेच थांबावे, स्थलांतर करू नये ; पंतप्रधानांचे आवाहन
- औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या ‘या’ महत्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात!
- रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मिळणार पण…
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात, निर्मात्यांना नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
