नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी देशातील डॉक्टरांशी संवाद साधला होता. तसेच आज त्यांनी लस उत्पादकांशीही संवाद साधला होता. याशिवाय त्यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी सुरुवात करतानाच त्यांनी सध्याच्या कोरोना लाटेला तुफान म्हणून संबोधले आहे. कोरोनाची हि लाट प्रचंड मोठी आहे. आणि यासाठी देशवासियांना धैर्यानी या संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी देशातील मजुरांना देखील एक मोठे आवाहन केले आहे. सध्याच्या या कठीण परीस्थितीत प्रवास करू नये, मजुरांनी जिथे आहे तिथेच थांबावे, स्थलांतर करू नये असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
तसेच ते यावेळी म्हणाले कि, ‘आपल्या शास्त्रात म्हटलंय, कठीण पेक्षाही कठीण काळात आपल्याला धैर्य सोडायला नको, असं म्हटलं आहे. कोणत्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतला तरच आपण यश प्राप्त करु शकतो. याच मंत्राला फॉलो करत देश पुढे जात आहे. कोरोना संकटात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या विषयावर पूर्णपणे संवेदनशीलपणे काम केलं जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांचे सर्वांचे प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत’, असं पंतप्रधान म्हणाले.
देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. मोदी यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला आहे. याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या कंपनींच्या मालकांसोबतही बैठक घेतली आहे. याशिवाय त्यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. याच बैठकीतील निर्णयाबाबत किंवा आणखी काही दुसऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयबाबत मोदी घोषणा करण्याची शक्यता होती.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आलेली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- परिवहन महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारचा नवा फंडा
- औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या ‘या’ महत्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात!
- रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मिळणार पण…
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात, निर्मात्यांना नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
