लातूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे राज्याला ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आयात करण्यासाठी स्पेशल रेल्वे तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्याचा कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र, या ऑक्सिजन एक्सप्रेसमुळे लातूरच्या वॉटर एक्सप्रेसच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
राज्याच्या इतिहासात प्रथमच दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता. एप्रिल २०१६ मध्ये ५० टॅकरच्या दोने रेल्वे (रॅक्स) तयार करण्यात आल्या होत्या. रेल्वेच्या कोटा इथल्या कार्यशाळेत वॅगनची स्वच्छता करण्यात आली. या वॅगनची पाण्याची क्षमता ५५ हजार लिटर होती. यामुळे लातूरकरांची पाण्याची गरज पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. मात्र, त्यामुळे लातूरकरांना थोडा दिलासा नक्कीच मिळाला होता.
२०१६ मध्ये लातूरला आलेल्या या वॉटर एक्सप्रेसनंतर आता २०२१ ला महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रेल्वे सेवेचा वापर करण्यात येत आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेसमुळे राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यातील अडचणी कमी होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, या ऑक्सिजन एक्सप्रेसमुळे लातूरकरांच्या वॉटर एक्सप्रेसच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- चेन्नई सुपर किंग्सची गुणतालीकेत भरारी; मुंबई आणि दिल्लीला टाकले मागे
- ‘चाचा विधायक है हमारे’, फडणवीसांच्या पुतण्याने नियमावली धुडकावत घेतली कोरोना लस !
- तिच तारीख, तोच कर्णधार, संघही तोच.. अगदी निकालही तोच.. बदलले फक्त वर्ष ; माहीचा अनोखा पराक्रम
- ‘मोदींच्या नेतृत्वात देशात कोरोनमुक्ती सोडाच, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे’
- सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजाचा बोलबाला; राजस्थानला ४५ धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

