🕒 1 min read
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील वेळीच्या लाटेपेक्षा यंदा अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देश पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असतानाच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पंचसूत्री मांडली आहे. याचे काटोकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान, इस्राईल हा देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा काल करण्यात आली आहे. या देशातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून जनजीवन ‘नॉर्मल’ झाले आहे. यावरूनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या या टीकेला भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कार्यकारी संपादक संजय राऊत यांना इस्रायलवर ‘अग्रलेख’ लिहायला वेळ आहे. आपल्या राज्यात रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर चा काळाबाजार होतोय, यावर मुग गिळून गप्प बसलेले राऊत जगाच ज्ञान देतायत! दिव्याखाली अंधार अन जगाच्या बाता मारताय !’ असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.
सामना अग्रलेखातील टीका –
कोरोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. इस्रायलने देश कोरोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहून जी पंचसूत्री काल मांडली तेच धोरण इस्रायलने राबवले.
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे प. बंगालच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून दिल्लीस परतले आहेत. दिल्लीत येताच दोघांनीही कोरोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावून कोरोनाच्या गांभीर्याबाबत चर्चा केली, तर श्री. शहा यांनी स्पष्ट केले की, घाईघाईने लॉक डाऊन लावण्याची गरज नाही. मोदी यांना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच. इस्रायल या देशाने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे.
पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने कोरोना लढय़ाचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्रायलच्या आधी आपला हिंदुस्थानच जगात कोरोनामुक्त होईल असे वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते. पण कोरोनामुक्ती सोडाच, देशात कोरोनाने घातलेले थैमान हाताबाहेर गेले.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व धार्मिक स्थळांच्या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करण्याची मागणी
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- बात निकली ही है तो दूर तक जायेगी…रोहिणी खडसे आणि भाजप आमदारामध्ये खडाजंगी !
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- नियमांना कोणी जुमानेना ! राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ नियम लागू होण्याची शक्यता !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

