Share

बात निकली ही है तो दूर तक जायेगी…रोहिणी खडसे आणि भाजप आमदारामध्ये खडाजंगी !

Published On: 

🕒 1 min read

माळशिरस : भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टीकेला भाजप आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंवर हल्लाबोल केला. ‘ ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.’ असा घणाघात राम सातपुते यांनी केला आहे.’

राम सातपुतेंच्या या टीकेला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही ? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का म्हणून ते गप्प आहेत ?’ असा प्रहार रोहिणी खडसे यांनी केला आहे.

आता हा वाद वाढतच असल्याचं दिसून येत आहे. कारण आमदार राम सातपुते यांनी ‘बात निकली ही है तो दूर तक जायेगी…’ असा इशारा दिला आहे. ‘भोसरी जमीन घोटाळा .. ताई मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंच या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं तीच कारवाई झाली ना तेव्हा आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगर च्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!’ असं ट्विट राम सातपुते यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!