मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अक्षरशः अव्वाच्या सव्वा भाव देऊन काळ्या बाजारातून खरेदी केलं जात आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले असून या इंजेक्शनमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या अनेक टोळ्यांना देखील पोलिसांनी गजाआड केलं आहे. दरम्यान, राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन वरून राजकारण तापल्याच पाहायला मिळत आहे.
रेमडेसिविरच्या साठेबाजीच्या संशयावरून ब्रुक कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली होती. यानंतर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी पार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु होत्या.
आता, राज्याचे सार्वजनिक बांधकाम बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्राकडे महत्वाची मागणी केली आहे. ‘रेमडेसिविरचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए ) व सक्तवसुली संचालनालय (ईडी ) यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- मोठी बातमी : देशातील कोरोना स्थिती गंभीर; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची मंत्रिमंडळ बैठक !
- ‘या’ कारणामुळे हार्दिक गोलंदाजी करू शकत नाही, प्रशिक्षक जयवर्धन यांनी सांगितले कारण


