Share

नियमांना कोणी जुमानेना ! राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ नियम लागू होण्याची शक्यता !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाचे कारण वगळता नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. मात्र, नागरिकांची वर्दळ अद्यापही कमी झाल्याचे दिसून येत नाहीये. यामुळे ज्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठवावे लागत आहे, त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून टास्क फोर्स ने देखील हे नियम परिणामकारक नसून कठोर नियमांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

कठोर निर्बंध लावण्याची मागणी अनेक मंत्री देखील करत असून अत्यावश्यक दुकानांना (मेडिकल वगळता) केवळ सकाळी ७ ते ११ यावेळेतच परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून आज दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यानंतर कडक निर्बंधांची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

कडक निर्बंधात ‘या’ गोष्टी मर्यादित वेळेत राहणार सुरु ?

१) किराणा दुकाने सकाळी ७ ते ११

२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११

३) भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

५) अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११

६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११

७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११

८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११

९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार
या बाबींचे जनतेने पालन करावे.

१०) हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.

‘या’ गोष्टी होणार बंद ?

१)धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.

२)आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.

३)भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त द्वार वितरणास मान्यता राहील.

४)दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.

५)टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.

६)चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

७)दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

८)सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.

९)कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.

१०)शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.

११)स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.

१२)विवाह समारंभास बंदी राहील.

१३)चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.

१४)अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.

१५)सिनेमाहॉल,नाट्य गृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.

१६)सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

१७)सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.

१८)सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.

१९)व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.

२०)बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!