Share

‘या’ कारणामुळे हार्दिक गोलंदाजी करू शकत नाही, प्रशिक्षक जयवर्धन यांनी सांगितले कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेची चांगली सुरुवात केली. आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली. मात्र, अष्टपैलू हार्दिक पांड्याची कामगिरी अजून दिसली नाही.

या आयपीएल मोसमात हार्दिक पांड्याने एकाही सामन्यात गोलंदाजी केली नाही. मात्र, आयपीएलच्या आधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने गोलंदाजी केली होती. त्यामुळे हार्दिक आयपीएलमध्ये नक्की का गोलंदाजी करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

आता मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने अखेर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. दुखापतीनंतर हार्दिक मैदानात परतला आहे. त्याला इंग्लंडविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर आम्ही उपचार करत आहोत. त्यामुळे तो पहिल्या तीन सामन्यांत गोलंदाजी करू शकला नाही, असे जयवर्धने म्हणाला. आणखी एक-दोन आठवडे त्याच्या खांद्यावर उपचार केला जाईल आणि त्यानंतर तो गोलंदाजी करताना दिसू शकेल, असे जयवर्धनेने स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!