दिल्ली : कोरोनाने पुन्हा एकदा राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अक्षरशः अव्वाच्या सव्वा भाव देऊन काळ्या बाजारातून खरेदी केलं जात आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले असून या इंजेक्शनमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या अनेक टोळ्यांना देखील पोलिसांनी गजाआड केलं आहे. अशातच आता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिवीर बाबत मोठा खुलासा केला आहे.
‘कोरोना या आजाराला एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण याबाबत अद्याप फार काही डेटा उपलब्ध होऊ शकलेला नाही. या आजारातून बरं होण्यासाठी सर्वत्र रेमडेसिवीर ची मोठी चर्चा सुरु आहे. पण मी स्पष्ट करु इच्छितो की, रेमडेसिवीर ही काही मॅजिक बुलेट नाही. आपण ते वापरतो कारण आपल्याकडे अँटी व्हायरल औषध नाही. आपण चांगलं अँटी व्हायरल औषध शोधण्यात कोणतीही प्रगती केलेली नाही.’ असं परखड मत देखील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी १९ एप्रिल रोजीच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
यसोबतच, ‘रेमडेसिवीर हे औषध कोणाला आणि कोणत्या परिस्थितीत दिलं गेलं पाहिजे याला फार महत्त्व आहे. रेमडेसिवीर हे रुग्णाला खूप आधी किंवा खूप नंतर देऊन फायदा नाही. रुग्णाला ते ५ व्या किंवा ७ व्या दिवशी दिलं गेल्यासच त्याचा फायदा होऊ शकतो. तर, रेमडेसिवीरने मृत्यूदर कमी होतो असं अद्याप तरी कोणत्या संशोधनातून आढळून आलेलं नाही.’ असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी रेमडेसिवीर कोणाला दिलं पाहिजे यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. ‘जे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि ज्यांच्या ऑक्सिजनची पातळी ही कमी झालेली आहे अशा लोकांना रेमडेसिवीर दिलं गेलं पाहिजे.’ असं देखील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या नेतृत्वात देशात कोरोनमुक्ती सोडाच, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे’
- ‘चाचा विधायक है हमारे’, फडणवीसांच्या पुतण्याने नियमावली धुडकावत घेतली कोरोना लस !
- सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजाचा बोलबाला; राजस्थानला ४५ धावांनी केले पराभूत
- मोठी बातमी : देशातील कोरोना स्थिती गंभीर; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची मंत्रिमंडळ बैठक !
- जर पराभव झाला असता तर तो माझ्यामुळे; संथ खेळीवर धोनीची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

