Share

होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यासोबतच आयपीएलच्या गेल्या 14 वर्षांच्या इतिहासात धोनीने मोठं यश मिळवलं आहे, सोबतच त्याने अनेक विक्रमदेखील केले आहेत.काल 19 एप्रिल 2021 रोजी धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा खेळला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळवण्यात आला. आयपीएलमधील कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना आहे.

धोनी या सामन्यात १४ व्या षटकात फलंदाजीला आला. मात्र, पुढच्याच षटकात तो माघारी परतला. राहुल तेवातिया टाकत असलेल्या या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नॉन-स्ट्राईकवर असलेला जाडेजा ही धाव काढण्यासाठी उत्सुक नव्हता आणि त्याने धोनीला मागे पाठवले. धोनी जवळपास अर्ध्या पिचवर आला होता. मात्र, तो वेगाने पुन्हा मागे परतला आणि आपण क्रिजमध्ये पोहचू शकणार नाही हे कळल्यावर त्याने डाईव्ह मारली. त्यामुळे तो आऊट झाला नाही. त्याने डाईव्ह मारताना दाखवलेल्या फिटनेसवर चाहते अचंबित झाले आहेत. व सोशल मीडियावरून धोनीच्या फिटनेसचे कौतुक देखील होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!