Share

‘ठाकरेजी, तुमच्या वाचाळवीरांना आवर घाला’, गाढवाच्या गळ्यात आ.गायकवाडांचा फोटो घालून धिंड

Published On: 

🕒 1 min read

बीड : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. भारतीय जनता पक्षाने गायकवाड यांचा निषेध करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांचा निषेध म्हणून संजय गायकवाड यांचा फोटो गाढवाच्या गळ्यात घालून आष्टी शहरातून त्यांची धिंड काढली. ‘किमान गाढव तरी समाजपयोगी असते. पण हे निरुपयोगी असलेल्या वाचाळवीर आ.गायकवाड सारख्यांना शिवसेनेने आवर घालावा’ असा इशारा धस यांनी दिला. यावेळी गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

https://www.facebook.com/mlasureshdhas/videos/146639677401048/

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरपेक्षा काही नातेवाईकच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करत आहेत. पर्यायाने काळ्या बाजारातून जास्तीचे पैसे घेऊन हे इंजेक्शन घ्यावे लागते आहे. याबाबत सरकार मूग गिळून गप्प का आहे? अजून किती लोकांचा जीव हे सरकार घेणार आहे? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

सातशे-आठशे रुपयांचे इंजेक्शन कोणत्याच रुग्णालयात भेटत नाही, पण जास्तीचे पैसे मोजले की हे इंजेक्शन कसे काय मिळते? या काळाबाजाराचा शोध सरकारने घेणे गरजेचे आहे. तसेच हे सरकार अजून किती जणांचा बळी घेणार आहे, असा सवालही आमदार धस यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!