Share

सोनियांना प्रत्युत्तर! ‘भेदभाव नाहीच, ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्र सरकार मदत देण्याबाबत गैर भाजप शासित राज्यांवर भेदभाव करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला होता. भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांना केंद्र सरकार दूजाभाव करत आहे. भाजपच्या राज्यात मात्र भरघोस मदत मिळत असल्याचा दावा सोनियांनी केला होता. याला केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, कोरोनाचा सर्वाधिक प्रदुर्भाव असणाऱ्या १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. यानंतर केंद्राने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ६ हजार १७७ मेट्रिक टन ऑक्सिजन हा कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये पुरवला जाणार आहे. यातील सर्वाधिक पुरवठा म्हणजे दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी दिली.

कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था ढासळण्याची भीती असून केंद्राकडे मदत मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे.

यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आलं आहे. २२ एप्रिलपासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून औद्योगिक कारणासाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!