Share

निलंग्यात २४ तासांत कोरोनाचे पाच बळी !

Published On: 

🕒 1 min read

लातूर: राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या प्रसाराला रोखण्यासाठी शासन तसेच स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून निलंग्यात आता चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.

निलंगा तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. तरीही काही जण बेजबाबदारपणे मोकाट फिरत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे त्यामुळे रविवार निलंगा शहरात स्मशान शांतता पाहायला मिळाली. दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत धोकादायक असून दररोज निलंगा शहर व तालुक्यात रुग्णांची संख्या शंभराने वाढत आहे. आजरोजी तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७५० च्या वरती गेल्याने चिंतेत भर घालणारी आहे.

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे सोमवार पासून जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते ११ ची वेळ दिली आहे. तर फळे खरेदीसाठी सायंकाळी ५ ते ७ ची वेळ जाहीर केली आहे. शनिवार व रविवारी पूर्वीच विकेंड लॉकडाऊन लावण्यात आल्याने दि १७ व १८ रोजी निलंगा शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांनी फौजफाटा लावून शहर कडकडीत बंद ठेवले होते. मागच्या २४ तासात तालुक्यातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!