🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज दिड हजारांच्या घरात रुग्णसंख्या निघत आहे. शहरातील रुग्णसंख्या त्यामानाने कमी असली तरीही २५ ते ४५ हा गट कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद महापालिकेने जास्तीत जास्त जनसंपर्क असणाऱ्यांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना लस देण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात एकुण अडीच ते तीन हजार कामगारांना लसीकरण केले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात हिच संख्या पाच हजारांपर्यंत नेली जाणार असल्याचे मसीआचे अध्यक्ष अभय हंसनाल यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन निर्देशानुसार आता ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करणे बंधनकारक आहे. शहरातील औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक कामगारांचे लसीकरण केले जात आहे. मनपाच्या वतीने नारेगाव आरोग्य केंद्र एन-७, सिडको, बी १ गरवारे कम्युनिटी सेंटर, रामलीला मैदानासमोर, मसनतपूर आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी लसीकरण सुरु झाले आहे.
औरंगाबाद महापालिका आणि मसिआच्या पुढाकाराने आपण औद्योगिक क्षेत्रातील ४५ वर्षांवरील कामगारांसाठी आजपासून लसीकरण सुरु करत आहोत. यात चिकलठाणा क्षेत्रातील कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात जवळपास तीन हजारचे टार्गेट ठरवले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात वाळूज भागातील पाच हजार कामगारांचे लसीकरण केले जाईल.
– अभय हंसनाळ, मसिआ अध्यक्ष
महत्त्वाच्या बातम्या
- रविवारी ‘इतके’ लोक विनाकारण निघाले घराबाहेर! त्यातून सहा पॉझिटिव्ह
- कोरोनाची परिस्थिती बिकट, तातडीने अधिवेशन बोलवा : चंद्रकांत पाटील
- परभणी जिल्ह्यात तालुकास्तरावर ५० बेडचे कोविड सेंटरची उभारणी करा : आ. लोणीकर
- महापालिका मिशन ‘मोड’वर! आजपासून व्यापारी, बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु
- जळकोट येथे लवकरच डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु होणार


