Share

कोरोनाची परिस्थिती बिकट, तातडीने अधिवेशन बोलवा : चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण अक्षरशः तडफडून जीव सोडत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक गलिच्छ राजकारण करण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लस, ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट बनली आहे. विधानसभेच्या विशेष सत्रात कोरोनाची परिस्थिती सरकारने स्पष्ट करावी, असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केल आहे.

‘महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. यावेळी सरकारने सर्व पारदर्शक परिस्थिती जनतेसमोर मांडावी, यासाठी तातडीने विधानसभा सत्राचे आयोजन करून सर्व आमदारांच्या समोर राज्यसरकारने सत्य परिस्थिती मांडावी, अशी मी मागणी करतो.’ अशा आशयाचे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!