औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन काळातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पकडून अँटिजेन तपासणी करत आहेत. नियुक्त पथकांनी रविवारी (दि. १८) दिवसभरात १७२ जणांची कोरोना चाचणी केली. त्यातून सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून संबंधितांना लगेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.
शहरात दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण निघत आहेत. शहरातील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून जाहिर केले आहेत. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती.
कुठलेही योग्य कारण नसतांना संचारबंदीतही अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून आले. त्यामुळे आता नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील चौकाचौकांमध्ये बेजबाबदारांना पकडून मोबाईल व्हॅनमध्ये कोरोना तपासणी करण्यात येत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हॅनची नजर असणार आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेजबाबदार नागरिकांविरोधात हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ विशाल पट्टेकर, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोडे, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन राबवित आहेत. रविवारी दिवसभरात १७२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात ६ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची परिस्थिती बिकट, तातडीने अधिवेशन बोलवा : चंद्रकांत पाटील
- परभणी जिल्ह्यात तालुकास्तरावर ५० बेडचे कोविड सेंटरची उभारणी करा : आ. लोणीकर
- महापालिका मिशन ‘मोड’वर! आजपासून व्यापारी, बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु
- जळकोट येथे लवकरच डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु होणार
- ‘अटक होणं सोपं नसतं, पैसे खाल्ल्यानंतर अटक टाळण्यासाठी पक्ष बदलावा लागतो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

