लातूर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरची संख्या देखील वाढवण्याचे काम सुरु आहे. सर्वसामान्य तसेच गोरगरिबांना आरोग्य सुविधा लवकरात लवकर मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागात देखील आता कोविड रुग्णालये सुरु करण्यात येत आहेत.
जळकोट तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून सर्वसामान्य गोरगरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार उदगीर, लातूर ,अहमदपूर च्या धर्तीवर जळकोट येथे लवकरच डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करणार असून त्यासाठी येथे दोन व्हेंटिलेटर व तज्ञ डॉक्टर तसेच २५ खाटाचे ऑक्सिजनचे हे कोविड सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी जळकोट येथील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत दिली.
या बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी तालुक्यातील कोविड आजारासंबंधीचा आढावा सादर केला. यावेळी उपस्थितांनी डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची जोरदार मागणी केली होती. राज्यमंत्री संजय बनसोडे व पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रयत्नामुळे हे यश आले आहे. जळकोट तालुक्यातील रुग्णांना शंभर टक्के मदत करू व औषधांचा पुरवठाही कमी पडणार नाही. २४ तास आरोग्य प्रशासन तुमच्या सेवेत आहे. काळजी करु नका, असे आवाहनही त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- जनतेच्या कल्याणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी चालतील – प्रसाद लाड
- रुग्णांना दिलासा! पालिका मागवणार शंभर ऑक्सिजन कॉन्संट्रेटर
- ‘सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे’
- रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात आहे; प्रियंका गांधींची फडणवीसांवर टीका
- केंद्रीय पथकाच्या सूचनांना मनपाने टांगले ‘हॉटस्पॉट’च्या वेशीवर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

