Share

महापालिका मिशन ‘मोड’वर! आजपासून व्यापारी, बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आता मिशन मोडवर गेली असून येत्या १ महिन्यात ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांना लस दिली जाणार आहे. याच अंतर्गत आजपासून शहरातील १२१ केंद्रावर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आता शहरातील व्यापारी, बँक अधिकारी-कर्मचारी व कंपनी कामगारांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (दि. १९) शहराच्या विविध भागात हे २३ केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

सोमवारी अकरा वाजता शहागंज भागातील आरोग्य केंद्रात माजी खा. चंद्रकांत खैरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, प्रफुल्ल मालानी यांच्या हस्ते व्यापाऱ्यांसाठी असलेल्या पहिल्या केंद्राचे उद्घाटन झाले. याठिकाणी व्यापारी वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्‍यानुसार महापालिकेने पाच एप्रिलपासून शहरात लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली आहे. ११५ वॉर्डात १५५ केंद्र व इतर सहा केंद्रावर दररोज सरासरी सहा ते सात हजार जणांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने दीड लाखांचा लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.

व्यापारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी, बँक अधिकारी-कर्मचारी व कंपनी कामगारांचा जास्तीत जास्त लोकांसोबत संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सोमवारपासून याठिकणी लसीकरण केले जाईल, असे थेटे यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांसाठीचे केंद्र

भवानी नगर आरोग्य केंद्र, नेहरू नगर आरोग्य केंद्र, नेहरू नगर आरोग्य केंद्र, चिकलठाणा आरोग्य केंद्र, बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र, कोकण वाडी चौक, क्रांती चौक आरोग्य केंद्र, सादात नगर आरोग्य केंद्र, गांधी नगर-खोकडपुरा आरोग्य केंद्र, औरंगपुरा आरोग्य केंद्र, जिन्सी आरोग्य केंद्र, पुंडलिक नगर आरोग्य केंद्र.

बँक कर्मचाऱ्यांसाठी केंद्र
आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र, क्रांती चौक आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी आरोग्य केंद्र, नेहरू नगर आरोग्य केंद्र, अंबिका नगर आरोग्य केंद्र, शिवाजी नगर आरोग्य केंद्र, बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र, पीर बाजार आरोग्य केंद्र, पीर बाजार आरोग्य केंद्र

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!