चेन्नई : आयपीएल स्पर्धा सुरु होऊन दहा दिवसाचा कालावधी झाला आहे. या दहा दिवसात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगीरी खुपच निराशाजनक राहिली आहे. पराभव झालेल्या तिनही सामन्यात हैदराबाद संघ धावांचा पाठलाग करत होता. चांगली सुरुवात करुनही तिन्ही सामन्यात हैदराबादला पराभवाचे तोंड बघावे लागले.
सलगच्या पराभवानंतर संघाचा महत्वाचा खेळाडू केन विल्यमसनला संघात घेण्याची मागणी सुरु असताना भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा याने हैदराबाद संघात बाकावर बसलेला अष्टपैलु खेळाडू केदार जाधव याला संघात स्थान द्यावे असा सल्ला दिला आहे. कारण हैदराबाद संघ खेळत असलेल्या एमए चिदंबरम मैदानावर केदार जाधव सीएसके कडुन बरेच सामने खेळला आहे. त्यामुळे त्याचा अनुभव संघासाठी उपयोगी ठरु शकतो. असे ओझाचे म्हणने आहे.
सद्यस्थितीत हैदराबादचा संघ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करत आहे मात्र मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरत असल्याने केदार जाधवला संघात स्थान दिले तर मधल्या फळीला याचा लाभ होईल असे प्रज्ञान ओझा म्हणाला. यंदाच्या आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने केदार जाधवला दोन कोटींच्या मूलभूत किंमतीत खरेदी केले होते. केदारने ८५ आयपीएल सामन्यात २२.८ च्या सरासरीने ११४१ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आम्ही रेमडेसिवीर पाकिस्तान किंवा चीनला देणार नव्हतो, तर…; चंद्रकांत पाटील कडाडले
- ८० कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भामटा गजाआड
- ‘राऊतांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावी, मी आता राऊतांवर एक पुस्तक लिहितो’
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्राला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे उत्तर
- कोरोनासह लॉकडाऊनने पशुपालक त्रस्त; दुधाचे दर चार रुपयांनी घसरले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
