वर्धा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात आणि कर्ज फेडण्यासाठी एका महिलेने चक्क स्वतःच्या मुलीचे विवस्त्र व्हिडीओ तयार करत ८० कोटींचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाला पाठवले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्या मांत्रिकाला अटक केली आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वर्ध्यातील एक महिलेवर कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी आणि झटपट करोडपती होण्यासाठी तिला एका महिलेने शक्कल सुचवली. एका मांत्रिकाच्या नादाला लागून तिने स्वतःच्या मुलीचा विवस्त्र व्हिडिओ तयार करून मांत्रिकाला पाठवला. तो मांत्रिक गुप्तधन काढण्यासाठी त्या २१ वर्षीय तरुणीला जंगलात विवस्त्र फिरवत होता.
दरम्यान, पीडित मुलीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पीडित मुलीची आई, काका, अमित चौधरी, किशोर सुपारे, प्रवीण पाटील दीपक कांबळे, बालू ऊर्फ मंगरुळकर यांना ताब्यात घेतले होते. त्या सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर त्या सर्वांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान, प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला भामटा मांत्रिक डीडी ऊर्फ दिनेश झाडे (वय ३६) याला पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राठोडनंतर यवतमाळचे नवे पालकमंत्री भुमरे विस्कटलेली घडी कशी बसवणार?
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा
- भाजप नेत्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आ.संजय गायकवाडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- पंजाबचा नादच खुळा!, अर्शदीप सिंगने केला ‘गब्बर’च्या स्टाईलमध्ये जल्लोश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

