नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक पत्र पाठवले होते. या पत्रावरून आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना उत्तर दिले आहे. अशा संकटाच्या प्रसंगी काँग्रेसच्या नेत्यांनी तुमच्या महत्त्वाच्या सूचनांचं पालन केलं तसेच एकमेकांमध्ये समन्वय ठेवला, तर ती चांगली बाब असेल, असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या संदर्भात डॉ. मनमोहन सिंग यांना एक पत्र पाठवले आहे. त्यामध्ये डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ज्या लोकांनी तुमचे पत्र तयार केले, त्यांनी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली नाही. कोरोना लस आयात करण्यासंदर्भात आपण जी मागणी केली आहे, ती १८ एप्रिल रोजी केली आहे. मात्र केंद्र सरकारेन ११ एप्रिल रोजीच अशा कंपन्यांना लस आयात करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये लस तयार करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदतीचा सल्लादेखील आपण उशिराने दिला आहे. याआधीच केंद्र सरकारने अशा कंपन्यांना आर्थिक मदत केली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात लसीकरण वाढविण्यासंदर्भात सूचना केली आहे. मात्र, काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी अद्याप देखील लस तयार करणारे भारतीय वैज्ञानिक आणि कंपन्यांचे कौतुक केलेले नाही.
History shall be kinder to you Dr Manmohan Singh ji if your offer of ‘constructive cooperation’ and valuable advice was followed by your @INCIndia leaders as well in such extraordinary times !
Here’s my reply to your letter to Hon’ble PM Sh @narendramodi ji ???? @PMOIndia pic.twitter.com/IJcz3aL2mo
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 19, 2021
वास्तविक काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र लिहिले होते. यामध्ये कोरोना लसीकरणात वाढ करण्यात यावी, ४५ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा विविध पाच सूचना करण्यात आल्या होत्या. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिखर धवनचा जलवा ; काही तासातचं मॅक्सवेलकडून घेतली ऑरेंज कैप
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा


