Share

पॉईंटमॅनच्या प्रसंगावधानाने वाचला चिमुकल्याचा प्राण; पहा थरारक व्हिडीओ !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनेकदा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या मराठी वाक्प्रचाराला समर्थक अशा घटनांची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक विचित्र अपघातांमध्ये आश्चर्यकारकरित्या जीव वाचला जातो. देशासह जगभरात रेल्वेशी निगडित अपघातांचे व्हिडीओ व्हायलर होत असतात. तर, मुंबईमध्ये देखील रेल्वेच्या अपघातातून केवळ पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचवल्याचे आपण पहिले आहे.

असाच एक प्रकार सध्या समोर येत आहे. १७ एप्रिल रोजी वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध महिला आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून जात होती. यावेळी, त्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे रुळांवर पडला. याच वेळी समोरून जोरदार वेगाने एक्स्प्रेस येत होती. यामुळे आईने आरडाओरडा करत मदतीसाठी साद घातली. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये चालकाच्या लक्षात येऊन देखील एक्स्प्रेसचा वेग अधिक असल्याने रेल्वे थांबवणे शक्य नसते.

या थरारक स्थितीमध्ये पॉईंटमन ने आपल्या जीवाची बाजी लावत रुळांवर त्या मुलाच्या दिशेने धाव घेतली. आणि अवघ्या काही अंतरावर रेल्वे असताना त्या मुलाला उचलून प्लॅटफॉर्मच्या दिशेने झेप घेतली. यामुळे या चिमुकल्याचा जीव वाचला. मयूर शेळके असं या पॉईंटमनच नाव असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!