🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीए, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.
या सामन्यात आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलीयर्सने अवघ्या ३४ चेंडुत ७६ धावांची वादळी खेळी केली. सामन्यातील दुसऱ्या डावात केकेआरचा दिनेश कार्तिक फलंदाजी करत असताना युजवेंद्र चहल षटक टाकत असताना यष्टिमागे उभा असलेल्या एबी डिव्हीलीयर्सच्या पत्नी आणि मुलांनी एबीला प्रेक्षकांच्या गॅलरीतुन हात दाखवला. त्यांना प्रतिसाद देत एबीनेही त्यांना हात दाखवला. एबीच्या प्रतिसादानंतर त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तर मुलांनी फ्लाइंग किस दिला. मुलाने फ्लाइंग किस देताच एबीचे डोळे पाणावले. मात्र लढवय्या एबीने आपले दु:खाला आवर घालत खेळाकडे लक्ष दिले.
https://twitter.com/IzmeArun/status/1383955038133833728
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाची आयपीएल स्पर्धा ही प्रेक्षकाशिवाय होत आहे. मात्र मैदानात विषेश प्रवेश म्हणून आयपीएलमधील संघातील खेळाडूंच्या कुटूंबीयाना प्रवेश दिला जात आहे. आयपीएल गव्हर्नींग कॉन्सीलचा शेवटच्या टप्प्यात कोरोनाची परिस्थिती बघून प्रेक्षकांना परवानगी देण्याचा विचार होता. मात्र कोरोनाचा दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे हे शक्य होईल असे वाटत नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- हि@## भाजपच्या लोकांनी माझ्यासमोर येऊन दाखवावं; आमदार गायकवाडांची पुन्हा एकदा जीभ घसरली
- आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर! जालना जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांचे हाल
- ‘आरसीबी आयपीएल विजेता बनू शकतो पण…’
- ‘गोकुळ’च्या निवडणुकांवर कोरोनाच सावट; निवडणुकीचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात !
- आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने केली पहिल्यांदा ‘अशी’ हॅटट्रिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

