🕒 1 min read
बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. यात त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थितीमध्ये केंद्रासह भाजपचं यावर सडकून टीका केली होती. तर, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप दरेकर यांच्या विषयी टिप्पणी करताना त्यांचा तोल घासल्याचे दिसून आले होते.
यानंतर, भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर देतानाच काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गायकवाडांच्या पुतळ्याचे दहन देखील केलं. आता, संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून भाजपसह नेत्यांवर टीका करताना त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. यामुळे लोकप्रतिनिधींना असंसदीय शब्दाचा वापर शोभतो का? राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना भाषेची पातळी सोडून बोलणे हे कितपत योग्य आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजप आमदार संजय कुटे यांच्यासह बुलडाण्यातील इतर भाजप नेत्यांवर निशाणा साधताना त्यांनी ५० मीटर अंतरावर येऊन दाखवावं मग संजय गायकवाड काय आहे हे दाखवतो अशी धमकी देताना त्यांनी अर्वाच्च भाषेत शिव्यांची लाखोली झाडली आहे.
फडणवीसांवर टीका –
‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. यासोबतच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा देखील एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडल्याचे त्यांनी जारी केलेल्या व्हिडीओमधून समोर आले होते.
- श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत करण्यात आली अँजिओप्लास्टी
- ‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतच किराणा, भाजीपाला विक्री
- देशात युद्धजन्य परिस्थिती, जनतेत संभ्रम आणि तणाव; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी
- ‘गोकुळ’च्या निवडणुकांवर कोरोनाच सावट; निवडणुकीचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

