Share

‘बर्थ डे बॉय’ची कमाल; वाढदिवसाच्या दिवशी अर्धशतक झळकावणारा के एल राहुल पहिलाच भारतीय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्स संघाने पंजाब किंग्सच्या संघाचा ६ गडी राखुन दणदणीत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्सने दिलेले १९६ धावांचे कठिण लक्ष्य चार गडी गमावत १९व्या षटकातच पार केले. धावांचा पाठलाग करताना ९२ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

रविवारी पंजाब किंग्सचा कर्णधार के एल राहुलचा २९वा वाढदिवस होता. या सामन्यात जरी पंजाब संघाला पराभव स्विकारावा लागला असला तरीही कर्णधार राहुलने स्वत:च्या वाढदिवशी अर्धशतकी खेळी करत आयपीएल मधील एका अनोखा विक्रम केलेल्या दिग्गजाच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत के एल राहुल पहिलाच भारतीय खेळाडू आहे. या यादीत पहिल्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. तर राहुल दुसऱ्या स्थानावर आहे.

२०२० मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये वॉर्नरने २७ ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ६६ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या स्थानी के एल राहुलचा समावेश झाला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्सचा माजी सलामीवीर माईक हसी आहे. त्याने, २७ मे २०१२ रोजी वाढदिवसाच्या दिवशी केकेआर विरुद्धच्या सामन्यात ५४ धावा बनवल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!