Share

आगामी टी-२० वर्ल्डकपच्या पाश्वभूमिवर एबी डीव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीये, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच षटकात कर्णधार कोहली आणि रजत पटिदार हे दोघे बाद झाले. यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत पहिले पड्डीकल(२५) आणि नंतर एबी डिव्हीलियर्स सोबत भागीदारी रचत ४९ चेंडुत ९ चौकार आणि ३ षटकारासंह ७८ धावांची खेळी केली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर डिव्हीलीयर्सने सामन्याची सुत्रे हाती घेतली. एबीने केकेआरच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवत अवघ्या ३४ चेंडुत ९ चौकार आणि ३ षटकारासंह नाबाद ७६ धावांची वादळी खेळी केली. या खेळीनंतर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपबाबत डीव्हिलियर्सनं एक मोठं वक्तव्य केलं आहे.

डीव्हिलियर्स तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला होता. त्यानंतर त्याच्या पुनरागमनाची चर्चा सतत सुरु आहे. केकेआर विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर डीव्हिलियर्सनं या विषयावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये समावेश झाला तर ते चांगलं असेल. पण मी पुनरागमन करण्यात अपयशी ठरलो तरी मला कोणतीही खंत वाटणार नाही. मला यामध्ये रस आहे. माझा फॉर्म आणि फिटनेसबद्दल बोलायचं तर आम्हाला सर्वश्रेष्ठ 15 खेळाडूंची निवड करायला हवी. आम्ही त्यानुसार योजना तयार करु. आयपीएल स्पर्धेच्या शेवटी मी या विषयावर बाऊचरशी चर्चा करणार आहे.’ असं डीव्हिलियर्सनं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!