🕒 1 min read
चेन्नई : भारतात सध्या आयपीएलची धामधुम सुरु आहे. स्पर्धा सुरु होऊन दहा दिवसाचा कालावधी झाला आहे. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादला सलग तीन पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. यातच हैदराबादच्या चाहत्याना एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलदांजी प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत मुथय्या मुरलीधरन हा हैदराबादच्या संघासोबत आहे. रविवारी १८ एप्रिल रोजी त्याला चेन्नई येथील ओपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुरलीधरन तपासणीसाठी गेला असता डॉक्टरांनी त्याला तत्काळ उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. यानंतर मुरलीधरनवर चेन्नई येथे अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी त्याच्या धमणीमध्ये एक स्टेंट टाकण्यात आला आहे. त्याचा मुरलीधरनच्या जीवाला कोणताही धोका नाही. त्याची प्रकृती आता स्थिर असुन तो लवकरच मैदानात दिसेल.
शनिवारी १७ एप्रिल रोजी एक दिवसापूर्वीच मुरलीधरनने त्याचा ४९वा वाढदिवस साजरा केला होता. मुरलीधरनने एकूण १३३ कसोटी सामने खेळत २२.७२ च्या सरासरीने एकूण ८०० विकेट्स घेतल्या आहेत. तर ३५० एकदिवसीय सामन्यात एकूण ५३४ विकेट्स घेतल्या आहेत. हा एक विक्रम आहे. सध्या तो आयपीएलमध्ये हैदराबादच्या संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मॅक्सवेलच्या दमदार खेळीनंतर सेहवागने केले प्रिती झिंटाला ट्रोल
- तळीरामांना कोरोना लवकर होतो असं म्हणतात; फडणवीसांच गायकवाडांना प्रत्युत्तर
- दिल्ली कॅपीट्ल्सचा पंजाब किंग्सवर ६ गडी राखुन ‘गब्बर’ विजय
- भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागलेत; शिवसेनेचं टीकास्त्र
- ‘या’ राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास RTPCR चाचणी बंधनकारक !

