Share

मॅक्सवेलच्या दमदार खेळीनंतर सेहवागने केले प्रिती झिंटाला ट्रोल

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीये, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच षटकात कर्णधार कोहली आणि रजत पटिदार हे दोघे बाद झाले. यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत पहिले पड्डीकल(२५) आणि नंतर एबी डिव्हीलियर्स सोबत भागीदारी रचत ४९ चेंडुत ९ चौकार आणि ३ षटकारासंह ७८ धावांची खेळी केली. त्याचा या वाढत्या फॉर्ममुळे चाहत्यांकडून त्यांचं कौतुक झालं. तर दुसरीकडे प्रिती झिंटाला ट्रोल करण्यात आलं आहे.

सेहवागने एका चित्रपटातील व्हिडीओ वापरला आहे. वापरण्यात आलेल्या या ‘अलबेला’ चित्रपटातील गाण्याद्वारे मॅक्सवेलच्या आयपीएलमधील याअगोदरच्या मालकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मॅक्सवेलची खेळी पाहून प्रितीच्या तोंडी ‘ओ बेटा जी…..’ हे गीत नक्कीच असेल, याचसोबत कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिलं आहे की, ‘अखेर मॅक्सवेलला आयपीएलमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहून आनंद झाला’

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!