औरंगाबाद : महाराष्ट्राचे फलोत्पादन तसेच रोजगार हमी मंत्री संदीपान भूमरे यांची यवतमाळ जिल्हाच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातील ज्येष्ठ नेत्याला दिलेल्या या जबाबदारी तसेच पदामुळे शिवसेनेच्या गटामध्ये आनंदाचे वातावरण आहेत.
मराठवाड्यासह औरंगाबाद हा शिवसेनेचा गड समजला जातो. वनमंत्री संजय राठोड यांनी तथाकथीत प्रकरणामुळे त्यांच्या वनमंत्री पदाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यामधील पालकमंत्री पद हे रिक्त होते. तसेच औरंगाबाद जिल्हामधील एकतरी मंत्री असावा ही महाविकास आघाडी सरकार आल्यापासुन शिवसेनेतील नेत्यांची मागणी होतीचय ही माागणी संदीपान भूमरे यांच्या माध्यमातून पुर्ण झाली आहे. शिवसेनेमध्ये संदीपान भूमरे हे मराठवाडा तसेच औरंगाबाद मधील शिवसेनेच्या स्थापनेपासूनच काम करतात. ते पाचव्यांदा विधानसभेवर निवडून देखील गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते फलोत्पादन तसेच रोजगार हमी योजना मंत्री देखील आहेत.
संदीपान भूमरे यांच्या रुपाने शिवसेनेला पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्याय दिला आहे. भूमरे हे शिवसेनेमधील ज्येष्ठ नेते आहेत. तर ते पाचव्यांदा निवडणुन देखील आहेत. तर ते ग्रामीण भागाशी त्यांच्याशी नाळ जोडली गेली आहे, त्यामुळे ते नक्की या पालकमंत्री या पदाला न्याय देतील, ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलतील यात मात्र शंका नाही. भूमरे यांना पालकमंत्री पदी निवड झाल्याने अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब सेवाभावी मंत्री; सेवा आणि मेवा कुठे जातो याची चौकशी व्हावी ! – राणे
- पालघर प्रकरणातील साधूंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – कदम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे; जितेंद्र आव्हाडांनी मानले पंतप्रधानांचे आभार !
- ‘कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
