🕒 1 min read
लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अहमदपूर तालुक्यातील खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये पुरेशा ऑक्सिजनबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जानवत असल्याने रुग्ण व नातेवाईकांची तारांबळ उडाली आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत असून डॉक्टरही हतबल झाले आहेत. शहरात खाजगी हॉस्पिटलमध्ये दोन कोवीड सेंटर व दोन अतिदक्षता विभाग आहेत.
त्याबरोबर शहरात जवळपास पंधरा मोठी खाजगी हॉस्पीटल असून शहरातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. येथे मागील सहा दिवसांपासून ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे. त्यामुळे अत्यवस्थेतच रुग्णांना पुढील उपचारासाठी लातूर, उदगीर, हैदराबाद, येथे जावे लागत आहे.
ऑक्सिजन तुडवड्या अभावी रुग्णांना जीव धोक्यात घालून घेऊन अंबुलन्स मध्ये घेऊन जावे लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत दिवसाला ५० सिलेंडरची मागणी असूनही ती पूर्ण होत नाही. संबंधितांनी लक्ष घालून होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना मोठ्या त्रासला सामोरे जाणार हे मात्र नक्की.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीचे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा, अजितदादांचा फडणवीसांवर हल्लाबोल
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सँपल घेण्याआधीच Collected चा मेसेज आल्याने काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह भडकले
- रोहित शर्माचे ‘ते’ वादग्रस्त ट्विट स्विगीने आखेर डिलीट केले; चाहत्यांची मागीतली माफी
- घरफोड्यांनी पोलीस कोठडीलाही सोडले नाही… लातूरात भर दुपारची घटना


