मुंबई : भारतात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो, तर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. लोकप्रियतेच्या बाबतीत सचिन नंतर एबी डिव्हीलीयर्सचे नाव घेतले जाते. मीस्टर ३६० या नावाने प्रसिद्ध असलेल्या एबीच्या फलंदाजीची मोहीनी पुर्ण भारतीय चाहत्यामध्ये आहे. अनेकदा भारताविरुद्ध खेळत असताना सुद्धा प्रेक्षक ‘एबी एबी’ असे चियर्स करतात.
मात्र भल्याभल्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवणाऱ्या एबीलाही एका गोष्टीची भीती वाटत असल्याची कबुली दिली आहे. यावेळी बोलताना एबी म्हणाला फलंदाजी करताना त्याला अपयशाची भीती वाटते. आणि या भीतीपोटी तो जोखीम घेतो आणि सर्वोत्तम फलंदाजीचे प्रदर्शन करतो. यामुळे त्याला एकाग्र होण्यास मदत होत असल्याचेही एबी म्हणाला. एबीची ख्याती आहे की तो कोणताही चेंडु मैदानात कुठेही मारु शकतो यामुळे त्याला मीस्टर ३६० म्हणले जाते.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात एबीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तडाखेबाज फलंदाजी करत आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महत्वाची बाब म्हणजे एबी पाच महिन्यानंतर कोणत्याही प्रकारचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला मैदानात उतरला होता. यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबी संघ चांगली कामगिरी करणार असल्याचाही त्याला विश्वास आहे.
महत्वाच्या बातम्या
- हे ममता बॅनर्जींचे ‘संस्कार’ आहेत – स्मृती इराणी
- जालना जिल्ह्यात १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध, पालकमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- राजस्थानच्या साकारियाला अनन्या सोबत डेटवर जाण्याची इच्छा !
- गेवराईत नगरपालिकेत लसीकरणाचा शुभारंभ; आ. पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन
- ‘आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

