🕒 1 min read
कोलकाता : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे.
दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. यामध्ये राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपा वर गंभीर आरोप केला आहे.
‘आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला’ असं म्हणत ममतांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने प्रचारासाठी बाहेरील राज्यांतून माणसं आणल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असा आरोप आता ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
I am shocked to hear that she is abusing Modi Ji & Amit Shah Ji for the pandemic. But this is Mamata Banerjee's 'sanskar'. Modi Ji addresses her as 'didi' but she abuses our leadership from public platforms: Union Minister Smriti Irani (14.04) https://t.co/QFPJXHXIj6 pic.twitter.com/Zym7glx2PR
— ANI (@ANI) April 15, 2021
यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील ममतांवर पलटवार केला आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत…यातून त्यांचे संस्कार दिसतात’, अशा शब्दात इराणींनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
‘मला हे ऐकून धक्काच बसला की, महामारीसाठी त्या मोदीजी आणि अमित शाह यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात’. अशा शब्दात इराणी यांनी ममता यांच्यावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- पराभवानंतरही हैदराबादचा कर्णधार वॉर्नरचा मोठा विक्रम; गब्बर आणि हिटमॅनला टाकले मागे
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

