Share

खासदार श्रीकांत शिंदे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशासह कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान अनेक राजकीय नेते, कलाकार मंडळी, यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नुकतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात देखील भाजप नेते आशिष शेलार यांना करोनाची लागण झाली आहे. तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. श्रीकांत शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे ‘आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणं दिसल्यास तात्काळ करोना चाचणी करावी’.

अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!