🕒 1 min read
जालना: जिल्ह्यात किरकोळ वादातून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ होत आहे, बुधवारी जालन्यात अशीच एक घटना घडली. दीर-भावजयीत झालेल्या किरकोळ वादामधून दिराने भावजयीच्या डोक्यात वीट मारून तिचा खून केल्याची घटना १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील तळतुंबा येथे घडली. घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. आशामती परसराम घुले असे मृत महिलेचे नाव आहे. मारुती तिरंदास घुले असे आरोपीचे नाव आहे.
मृत महिलेचा पती मागील पंधरा ते वीस वर्षांपूर्वी तिला सोडून गेलेला आहे. महिला गावातच राहत होती. दोन वर्षांपूर्वी महिलेच्या मुलानेदेखील आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. जुने घर आणि नवीन घर यामधून वाद होत असे. या वादातून बुधवारी सकाळी मारुती घुले याने आशामती परसराम घुले या महिलेच्या डोक्यात विट घालून तिचा खून केला. त्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला. जखमी महिलेला सुरुवातीला सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
प्रकृती गंभीर असल्याने महिलेस परभणीच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल, पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे, पोलिस उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी भेट देत पंचनामा केला. दरम्यान, खुनी दीर सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- पराभवानंतरही हैदराबादचा कर्णधार वॉर्नरचा मोठा विक्रम; गब्बर आणि हिटमॅनला टाकले मागे
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही


