🕒 1 min read
मुंबई : देशासह कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अनेक राजकीय नेते, कलाकार मंडळी, यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नुकतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
I have tested positive for #Covid_19 today. I am under medication & advice all those who have been in contact with me to isolate themselves & seek medical guidance. I remain available here & via my office for hlp & assistance to Mumbaikars !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 14, 2021
राज्यात देखील भाजप नेते आशिष शेलार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. माझी कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले आहे. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- पराभवानंतरही हैदराबादचा कर्णधार वॉर्नरचा मोठा विक्रम; गब्बर आणि हिटमॅनला टाकले मागे
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

