Share

सलग मिळालेल्या दोन्ही विजयाचे श्रेय ‘या’ दोन खेळांडूना : कर्णधार विराट कोहली

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या आरसीबी संघाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

आरसीबीच्या संघाचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. सामन्यानंतर कोहलीने या विजयाचे विशेष श्रेय ग्लेन मॅक्सवेल आणि युवा गोलंदाज हर्षद पटेल यांना दिले. यापुर्वी सलामीच्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सच्या संघाचा २ गडी राखुन पराभव केला होता. तर बुधवारी झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा ६ धावांनी पराभव केला. या दोन्ही सामन्यात फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ने चांगली फलंदाजी करत धावसंख्येला हातभार लावला.

सलामीच्या सामन्यात मॅक्सवेलने २८ चेंडुत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या होत्या. तर हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ४१ चेंडुत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. तर युवा गोलंदाज हर्षद पटेलने गोलंदाजीत चांगली कामगीरी केली. पहिल्या सामन्यात हर्षदने ४ षटकात २७ धावा देत ५ गडी बाद केले होते. तर हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात २५ धावा देत दोन गडी बाद केले. यावेळी मला संघाचा अभिमान वाटत आहे असे कर्णधार कोहली म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!